Header & Footer Wide Ads

ऑस्ट्रेलियात भीषण आग, २४ नागरिकांसह ५० कोटी प्राण्यांनी गमावला जीव

जगभरात हळहळ
सिडनी –
ऑस्ट्रेलियातील जंगलात चार महिन्यांपासून भीषण आग लागली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी आग आहे. युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या इकॉलॉजिस्टच्या अंदाजानुसार या आगीमुळे आतापर्यंत २४ नागरिकांसह जवळपास पाच कोटी प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे. 

आग नैसर्गिक कारणांमुळे लागल्याचे समजते. या वर्षी दुष्काळाच्या झळा प्रचंड बसल्या होत्या. ऊन आणि वेगाचा वारा यामुळे आग झपाट्याने पसरली. न्यू साऊथ वेल्सच्या मध्य उत्तर भागात सर्वाधिका प्राणी आहेत. या भागालाही आगीने वेढले आहे. वेल्सनंतर आग विक्टोरियापर्यंत पोहचली. गेल्या आठवड्यात मल्लकूटातील जंगलाला आग लागली. जवळपास सव्वा कोटी एकर क्षेत्र आगीत भस्मसात झाले आहे. ही आग विझवण्यासाठी ७५ हजार कर्मचारी काम करत आहेत. आगीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे.

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.