Header & Footer Wide Ads

महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार :बाळासाहेब थोरात यांचे संकेत

 नागपूर – कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा प्रयोग यशस्वी केल्यानंतर आता आगामी काळात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतदेखील जिथे शक्य असेल त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तसे संकेत दिले आहेत. 

काही झाले तरी महाविकास आघाडीचा विजय होणे हे आमच्यासाठी महत्वाचे असल्याचे थोरात यांनी नमूद केले. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरातील काँग्रेसच्या कार्यालयात काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्ग यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. 

मागील महिनाभरात आमच्या तीन ही पक्षातील संवाद आणि बैठका लक्षात घेता, आम्ही चांगल्या प्रकारे सरकार चालवू. तसेच सर्वसामान्य जनतेला निश्चितच न्याय देण्याचा प्रयत्न करू असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.