Header & Footer Wide Ads

भाजपाला धक्का:विजयसिंह मोहिते पाटील म्हणतात मी तर राष्ट्रवादीतच

पुणे – राज्यातील सत्ता बदलानंतर लोकसभा-विधानसभा निवडणुकीत मेगा भरती करणाऱ्या भाजपाला गळती लागण्यास सुरूवात झाली आहे. मध्यंतरीच्या काळात भाजपाच्या व्यासपीठावर दिसणारे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले की, “मी अजून राष्ट्रवादीतच आहे. माझा मुलगा भाजपमध्ये गेलेला आहे.” यामुळे भाजपाला धक्के बसण्यास सुरूवात झाल्याचे मानले जात आहे. 

पुण्यात आज (बुधवारी) विजयसिंह मोहीते पाटील हे वसंतदादा शूगर इन्स्टिट्यूटच्या ४३ व्या बैठकीस उपस्थित होते. कार्यक्रमास प्रारंभ होण्यापूर्वी मोहीते पाटील यांनी चक्क शरद पवारांबरोबर तासभर गुफ्तगू केले. त्यामुळे कार्यक्रमस्थळीच चर्चेला उधाण आले होते. 

लोकसभा निवडणुकीत माढाच्या मतदारसंघातील उमेदवारीवरुन नाराजीनाट्य रंगल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार विजयसिंह मोहीते पाटील हे पक्षापासून दूर गेले होते. विजयसिंह मोहीते पाटील यांचे सुपुत्र रणजीतसिंह मोहीते पाटील यांनी तर भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर विजयसिंह राष्ट्रवादीच्या कोणत्याही मंचावर दिसले नव्हते. त्यानंतर लोकसभा-विधानसभा निवडणुका पार पडल्या. लोकसभेत भाजपाला पुन्हा एकदा सत्ता मिळाली तर विधानसभेत मात्र भाजपाला सत्ता गमवावी लागली होती. विजयसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपला छुपा पाठिंबा दिला. त्यामुळे लोकसभेला माढा आणि विधानसभेला माळशिरस मतदारसंघ राष्ट्रवादीला गमवावा लागला होता.  

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.