Header & Footer Wide Ads

Chandrayaan 2 :नासाने प्रसिद्ध केली विक्रमच्या लँडिंग साईटचे फोटो

नवी दिल्ली -अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने भारताच्या महत्वाकांक्षी मिशन चंद्रयान -2 मधील लॅन्डर विक्रमच्या लँडिंग साइटची छायाचित्रं प्रसिद्ध केली आहेत. विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड लँडिंग झालं असं नासाचे म्हणणे आहे. म्हणजेच विक्रम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर वेगाने खाली आला असावा .विक्रमचं कोणतंही चित्र नासाने अद्याप जाहीर केलेलं नाही. पण त्याने असं आश्वासन दिलं आहे की,ऑक्टोबरमध्ये नासा आणखी काही छायाचित्रे प्रसिद्ध करू शकेल. नासाची उच्च रिझोल्यूशन प्रतिमा त्याच्या चंद्र ऑर्बिटर कॅमेर्‍याद्वारे हे छायाचित्र काढले आहे.

नासाच्या शास्त्रज्ञांच्या मते, चंद्रावर रात्री आहे. ज्यामुळे बहुतेक पृष्ठभागावर फक्त छाया दिसू शकते. अशा परिस्थितीत लँडर एखाद्या सावलीत आणि धूळीमध्ये लपला असावा असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. 

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.