Header & Footer Wide Ads

आर्थिक मंदीवरून लक्ष विचलीत करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा – राज ठाकरे

पुणे – नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. संपूर्ण देशात जी काही आर्थिक मंदी आहे त्यावरून लक्ष विचलीत करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या निमित्ताने केले असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. मात्र बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तानातून येणाऱ्या मुस्लिमांना देशाबाहेर हाकलेच पाहिजे. नेपाळ, पाकिस्तानातून किती मुस्लिम आले त्याची तपासणी होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
सर्व देशांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काय धर्मशाळा आहे का, १३५ कोटी लोकसंख्या असेलेल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता आहे असा सवालही ठाकरे यांनी मोदी सरकारला केला.  देश म्हणून आपण आणखी ओझं वाहू शकत नाही, असेही ते म्हणाले. 

लोकसंख्येमुळे अनेक सिस्टम्स फेल गेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही धर्माचा माणूस असेल त्याला बाहेरून आपल्या देशात आणायची काय गरज आहे. आपल्या देशात जे मुस्लिम नागरिक राहतात त्यांना असुरक्षित वाटण्याचे कारण काय, सर्व लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काही धर्मशाळा नाही. अन्य देशातून आलेल्या लोकांना हकलावून दिले पाहिजे. इकडे राहत असलेल्यांची चिंता मिटत नाही, तर बाहेरून आणखी लोकं का हवी, असा सवालही त्यांनी केला. 

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.