Header & Footer Wide Ads

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कोरेगाव भीमा विजयस्तंभास अभिवादन

पुणे – कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी नववर्षाच्या पहिल्या दिनी मोठ्या संख्येने नागरिक दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी सात वाजता येथील विजयस्तंभास अभिवादन केले. हा अभिवादन सोहळा शांततेत पार पडण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे.

आजच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा, सणसवाडी, येथील शाळा व महाविद्यालयांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एकुण ७४० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. याशिवाय सोशल मीडियावर देखील पोलिसांची करडी नजर आहे. २५० पेक्षा अधिक व्हॉट्स ग्रुप अॅडमिन्सना नोटीसा देखील बजावण्यात आल्या आहेत.

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.