Header & Footer Wide Ads

वेधगौरव पुरस्काराचे रविवारी १२ जानेवारीला वितरण

जनस्थान ग्रुपला  यंदाचा वेध गौरव पुरस्कार 

नाशिक : जिल्हयातीलच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या वेध न्यूजच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दि.12 जानेवारी 2020 रोजी सांयकाळी 5.30 वाजता गोदातीरी रामकुंड पंचवटी येथे नाशिक जिल्हयाचे पालकमंत्री व अन्न नागरी संरक्षक मंत्री ना.छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व कृषीमंत्री ना.दादा भुसे व स्वामींनारायण ट्रस्टचे व्यवस्थापक स्वामी ज्ञान पुराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रांत कार्यकारणाऱ्या व्यक्तीं सह नाशिक च्या सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जनस्थान ग्रुप (जागर कलेच्या ) या ग्रुपला  प्रतिष्ठीत असा वेध गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

या कार्यक्रसाठी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर सतीश कुलकर्णी,आमदार देवयानी फरांदे,जिल्हापरिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर ,खासदार हेमंत गोडसे,खासदार भारती पवार,आमदार सीमा हिरे,आमदार राहुल ढिकले,आमदार सरोज अहिरे यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे

या वर्षीच्या वेध गौरव पुरस्कारासाठी नगरसेविका समिना मेमन,व्हायब्रेशन ॲकेडमीचे संचालक किरण वाघमारे, पोलिस उपायुक्त व निर्भया पथक प्रमुख पौर्णिमा चौघुले, लायन्स क्लबचे अध्यक्ष जयओम व्यास,ज्योतीष शास्त्र प्रविण नीता सोनवणे,सहाय्यक पोलिस आयुक्त सोमनाथ तांबे,ग्रामसेवक कैलास वाघचौरे, नगरसेविका सत्यभामा गाडेकर,रुंग्ठा ग्रुपचे निखिल रुंगठा, सुला वाईनचे उपाध्यक्ष संजीव पैठणकर,ज्येष्ठ नगरसेविका विमल पाटील,कृषी तज्ञ पांडुरंग वाठारकर,नगरसेविका स्वाती भामरे, युनिव्हर्सकल कम्युनिकेशनचे अशोक राहणे,ब्रम्हकुमारी प्रजापती विश्वविद्यालयाच्या निता दीदी,कामगार नेते प्रवीण तिदमे, न्यूज 18 नेटवर्कचे उपसंपादक विशाल परदेशी,विमा तज्ञ छगन साळी, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी,  हिराई प्लॅस्टीकचे संजय नाईक,नाशिकच्या प्रसिध्द साधना मिसळचे मंगेश आमले व राजन आमले, चित्रकार विनोद सोनवणेव दिगंबर अहिरे, मनपाच्या अग्नीशामक दलाचे विजय नागपुरेव नाना गांगुर्डे,गंगापू रोड भागात आढळलेल्या बिबटयाला जेरबंद करणेकामी जीवाची बाजी लावलेले नगरसेवक संतोष गायकवाड,पत्रकार कपिल भास्कर व तरबेज शेख कॅमेरामॅन किरण कटारे गीनीज बुक ऑफ रेकॉडच्या समन्वयीका आमि छेडा, तसेच जनस्थान ग्रुप(जागर कलेचा ) , सानेगुरुजी शिक्षण प्रसारक संस्था व मार्शल आर्ट,सानिया खान व जय बालाजी बहुउद्देशिय संस्था आदी मान्यवरांची व संस्थांची निवड करण्यात आलेली असून त्यांना वरील मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे.

तरी सदरचा पुरस्कार वितरण समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमास  नाशिककरांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे प्रमुख संतोष कमोद, सुहता योगेश कमोद, शारदा कमोद यांनी केले आहे.

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.