Header & Footer Wide Ads

इंग्लंडचे जलदगती गोलंदाज बॉब विलिस यांचे निधन

ॲशेस हिरो म्हणून होते परिचित..
मुंबई –
इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार तसेच जलदगती गोलंदाज बॉब विलीस यांचे बुधवारी थायराइड कँसरमुळे निधन झाले. विलिस यांनी १९८१ मधील ॲशेस मालिकेत केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे ते ॲशेस हिरो म्हणून ओळखले जायचे. मृत्यूसमयी त्यांचे वय ७० होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व बहिण आहेत. 

विलिस यांनी ९० कसोटी सामन्यात ३२५ बळी नोंदवले होते. १९७०-७१ च्या ॲशेस दौऱ्यापासून त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांनी १९८४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तेव्हा ते इंग्लंडकडून सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज होते. इयान बॉथमने त्यांचा विक्रम मागे टाकला. १९७५ मध्ये विलिस यांच्या दोन्ही गुडघ्यांवर शस्त्रक्रिया झाली. तरीही त्यांनी लक्षणीय कामगिरी केली. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ३०८ सामन्यात २४.९९ च्या सरासरीने त्यांनी ८९९ बळी घेतले. निवृत्तीनंतर ते मिडीयात कार्यरत होते. 

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.