Header & Footer Wide Ads

जन्मजात हृदयविकार असलेल्या मुलांसाठी नाशिकमध्ये पहिला आउटरीच ओपीडी विभाग

वाडिया हॉस्पिटलने नाशिकमध्ये सुरू केली पहिला आउटरीच ओपीडी विभाग, विजन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या (नाशिक) सहयोगानेआउटरीच ओपीडी नाशिकमध्ये सुरू होणार, आता पर्यंत रुग्णालयाने १५००हून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेतयातील १५० मुले उत्तर महाराष्ट्रातून आलेली होती, हृदयविकारग्रस्त लहान मुलांसाठी हा बाह्यरुग्ण विभाग वरदान ठरेल


नाशिक: वाडिया हॉस्पिटल्स आपल्या देशातील एक समृद्ध वारसा असलेली संस्था आहे. हे रुग्णालय देशभरातील तसेच परदेशातील रुग्णावर उपचार करत आहे. नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील बालरुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयाने विजन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरशी सहयोग केला आहे आणि याद्वारे आउटरीच ओपीडी या संकल्पनेची ओळख करून दिली आहे. बालरुग्णांना हृदयरोगतज्ज्ञांकडून अत्याधुनिकवैद्यकीय निदान व तपासणीची सुविधा देण्यासाठी रुग्णालयाने अशा प्रकारे पुढाकार घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जन्मजात हृदयविकारांना जन्मजात हृदयदोषही म्हटले जाते. या अवस्थेमध्ये रुग्णाच्या जन्मापासून हृदयात दोष असतो.  दर १००० नवजात अर्भकांपैकी ०.१६ ते ०.३६ जणांमध्ये हृदयविकार आढळतो आणि जन्मानंतर पहिल्या आठवडाभरात हृदयविकारामुळे होणाऱ्या २५ टक्के मृत्यूंना जन्मजात दोष जबाबदार असतात. म्हणूनच बीजेडब्ल्यूएचसीने पुढाकार घेऊन नाशिकमध्ये संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी आउटरीच ओपीडी सुरू केली आहे. हृदयविकाराने ग्रस्त मुलांसाठी हे वरदान ठरणार आहे. कारण, त्यांना मुंबईतील बाई जेरबाई लहान मुलांच्या रुग्णालयात अत्यंत प्रगत उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत.

 डॉ. मिनी बोधनवाला(वाडिया हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी,परळ)

  “वाडिया हॉस्पिटल्समध्ये २०१७ मध्ये अतिप्रगत कॅथ लॅब आणि डेडिकेटेड कार्डिअॅक शस्त्रक्रिया दालन,आयसीयू यांच्यासह कार्डिअॅक विभागाची स्थापना झाल्यापासून १५०० रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. या उपचारांच्या यशस्वीतेचा दर १०० टक्के आहे. यातील १५० रुग्ण एकट्या उत्तर महाराष्ट्रातून आलेले होते. महाराष्ट्राच्या अन्य भागांतून येणाऱ्या रुग्णांचे महत्त्व समजून घेऊन वाडिया व्यवस्थापनाने आउटरीच ओपीडी केंद्र सुरू करण्याचे उदात्त पाऊल उचलले आहे. बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटलमधील हृदयरोगतज्ज्ञ दोन (अल्टरनेट) रविवारी, महिन्यातून दोनदा, मुलांसाठी ओपीडी घेतील. बहुतेक प्रक्रिया तसेच फॉलो-अप नाशिकमध्ये होणार असल्याने या भागातील मुलांसाठी ते खूप सोपे होईल.”

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.