Header & Footer Wide Ads

हृदयविकार आणि शंका

डॉक्टरांनी सुरू केली रक्त पातळ होण्याची गोळी एक-दोन दिवस मध्येच विचारल्यास लगेच त्रास होऊ शकतो का ? किती दिवसांचा गॅप चालू शकतो?

रक्तातील गुठळी ही लघुपेशी  एकमेकींना चिकटल्यामुळे निर्माण होते. ऍस्परिन व तत्सम रक्त पातळ होण्याची औषधे लघु पेशींना एकमेकांशी चिकटण्यास अविरोध करतात लघु पेशींचे आयुष्य सात दिवस असते ऍस्परिन  घेतल्यावर या पेशी पूर्णपणे निकामी होतात.  सात दिवसांसाठी मात्र नवीन लघु कशी सतत तयार होत असल्यामुळे दररोज गोळी घेणे अनिवार्य असते गोळी न घेतल्यास लगेच त्रास होईलच असे नसते  हृदय विकार असणाऱ्यांना व्यक्तींना इतर शस्त्रक्रिया करण्याची करायची असल्यास या गोळ्याचे चार-पाच दिवस आधी बंद करतो तोच सहसा कोणाला त्रास होत नाही मात्र वारंवार असे करणे धोकादायक ठरू शकते


आपल्यासमोर एखाद्या पेशंटला हार्ट अटॅक आला आहे हे कसे ओळखावे ! व काय मदत करावी !

 हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे आपण बघितलेली आहेत जर अशी लक्षणे आपल्याला कोणामध्ये दिसून आली तर सर्वप्रथम त्याला धीर देऊन त्याची भीती कमी करावी त्याला दीर्घ श्वास घेऊन खोकला चार पाच वेळेस करायला लावणे.  त्याची इतर हालचाल बंद करणे रुग्णवाहिकेत अथवा इतर वाहनात उचलून ठेवणे त्याला चालू देऊ नये ऍस्परिन  व सॉर्बिट्रेट उपलब्ध असल्यास या गोळ्याला देणे. 


ऍन्जिओग्राफी आणि हृदयाच्या सिटीस्कॅन मध्ये काय फरक आहे !  कोणती तपासणी अधिक योग्य

ऍन्जिओग्राफी मांडीच्या रक्तवाहिन्या छिद्र पाडून दोन मिनिट व्यासाची एक नळी त्याद्वारे हृदयाच्या पर्यंत नेऊन केली जाणारी तपासणी असते.  कॉन्ट्रास्ट नावाने एक रसायन धमन्यांमध्ये ढकलले जाते आणि त्याच्या धमन्यांमधील प्रवाहाचे नियंत्रण केले जाते.  हे चित्र सुस्पष्ट असते आणि त्याच्या निदानाची  शाश्वती शंभर टक्के असते.  सिटी ऍन्जिओग्राफी मध्ये हाताच्या मधून हेच रसायन ढकलले जाते.  मात्र हृदयाच्या धमन्यांचे पर्यंत पोचतो ते फिके पडते आणि चित्रण तितकेसे स्पष्ट होऊ शकत नाही.  हृदयाच्या स्पंदनाची गती प्रतिमिनिट ६०  पेक्षा अधिक असल्यास चित्र अजूनही स्पष्ट होते त्यामुळे ज्या रुग्णांमध्ये हृदयविकाराची शक्यता जास्त असते.  अशांमध्ये सिटी एन्जोग्राफी फारशी उपयुक्त ठरत नाही . 


ऍन्जोग्राफी दरवर्षी करणे आवश्यक आहे ? 


स्ट्रेस टेस्ट सारखी दरवर्षी ऍन्जिओग्राफी करणे शिफारस फार नाही.  स्ट्रेस टेस्ट मध्ये दोष आढळला आणि हृदयरोग तज्ञ आणि सल्ला दिला तरच ऍन्जिओग्राफी करणे योग्य ठरते
(क्रमशः)


अनिरुद्ध वि धर्माधिकारी 

फोन ९८२३०३३६४६

email – aniepaul@hotmail.com 

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.