Header & Footer Wide Ads

माणिकराव शिंदे यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

छगन भुजबळांविरोधात काम..
नाशिक –
(प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीत येवला मतदारसंघात ना. छगन भुजबळ यांच्या विरोधात काम करत पक्षविरोधी भुमिका घेतल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने माणिकराव शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी तसे पत्र संबंधितांना पाठवले आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी येवला मतदार संघातून छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असताना तसेच त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी असतानाही शिंदे यांनी शिवसेना उमेदवार संभाजी पवार यांचा प्रचार केल्याचे तसेच भुजबळ यांच्या विरुद्ध खोटे-नाटे आरोप करून त्यांना पराभूत करण्याचे आवाहन मतदारांना केल्याचा ठपका माणिकराव शिंदे यांच्यावर ठेवण्यात आला होता. 

याबाबतचे वृत्तपत्रीय कात्रणे, पक्ष निरीक्षकांचा अहवाल तसेच कार्यकर्त्यांच्या तक्रारी प्रदेश कार्यालयाकडे आल्यानंतर सत्यता तपासण्यासाठी सर्व कागदपत्रे १० डिसेंबरला शिस्तपालन समितीसमोर ठेवण्यात आली होती. या समितीमध्ये सविस्तर चर्चा होऊन शिंदे यांच्याकडून लेखी खुलासा मागवण्यात आला. परंतू शिंदे यांनी केलेला खुलासा सत्य परिस्थितीला धरून नसल्याचे स्पष्ट करत पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आहे. 

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.