Header & Footer Wide Ads

बाजार दिवसभर अस्थिर:शेवटी सावरला

विश्वनाथ बोदडे
८८८८२८०५५५

आज सकाळपासून भारतीय बाजारावर आंतरराष्ट्रीय बाजाराची छाया दिसत होती. अमेरिका, चायना, जपान , त्याचबरोबर सिंगापूर निफ्टी सुद्धा मोठ्या प्रमाणात खाली होती . त्याचेच पडसाद सुरवातीला भारतीय शेअर बाजारात दिसले , आज संपूर्ण दिवसभर बाजार मोठ्या प्रमाणात चढ उतार बघायला मिळालेत परंतु शेवटच्या सत्रात बाजारात काही प्रमाणात खरेदी बघायला मिळाली त्यामुळेच भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक -५० अंकांनी घसरून ४०८१७ ह्या स्तरावर स्थिरावला तर निफ्टी सुद्धा -२७ अंकांनी घसरून १२०२५ ह्या पातळीवर बंद झाला. 

आज दिवसभर भारतीय शेअर  बाजारात अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या वादाबद्दल चर्चा होती. या पुढे अमेरिका अथवा इराण काय पाऊल उचलते ह्यावर सर्व जगाचे लक्ष लागून आहे, जर युद्धाचा भडका झाला तर ह्या दोन देशातील  अर्थव्यवस्थेवर परीणाम तर होणारच त्याच बरोबर जगातील देश्यानवर सुद्धा परीणाम होणार आहेत, ह्यात भारताचा सुद्धा समावेश असेल.


आजच्या बाजारातील लांबीचा विचार केला तर १००८ समभाग सकारात्मक होते तर तब्बल १४१३ समभाग नकारात्मक दिसले व १७९ समभागांमध्ये कोणताही बदल दिसला नाही. 
क्षेत्रीय समभागांचा विचार केला तर एफ एम जी सी आणि आई टी सोडले तर ऑटो , मेटल फार्मा आणि इन्फ्रा ह्या क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा जोर दिसला.

 
आजच्या सत्रात भरती ऐरटेल, टी सी एस, येस बँक, अल्ट्रा टेक सिमेंट, आणि यु पी एल ह्या समभागांमध्ये मागणी दिसली तर निफ्टी मधील आईचर मोटर, कोलइंडिया , एल अँड टी , आणि ओएनजीसी ह्या समभागांमध्ये विक्री बघायला मिळली.


बाजारअजून काही अस्थिर स्वरूपात दिसू शकतो करण जो प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव दूर होत नाही तो पर्यन्त सर्वच शेअर बाजारामध्ये चांगलेच चढ उतार बघायला मिळतील. 
निफ्टी १२०२५ – २७.६०

सेन्सेक्स ४०८१७ – ५१


आज निफ्टी मधील पाच वधारलेला शेअर्स  

भारतीएअरटेल ४५९ + ३% येसबँक ४६ + २.२२% टिसीएस २२५३ + २.१५%अल्ट्रासीमकाे ४३०८ + १.५५%बजाजफायनंस ४०५१ + १%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव


आयशरमाेटर १९९०० – ४%काेलइंडीया २००.५० – २.५३%एलटी १२९१.५० – २.२०%आयआेसी १२२ – २%आेएनजीसी १२३.४५ – २%


यु एस डी  आई एन आर $ ७१.७७६४

सोने १० ग्रॅम               ४०७८५.००

चांदी १ किलो             ४८२३०.००

क्रूड    ऑईल              ४५१८.००

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.