Header & Footer Wide Ads

व्हॉटसअपचे नवीन फीचर : आता तुमच्या संमतीनेच ग्रुप वर ऍड करता येणार

मुंबई-सर्वांच्या जीवनाची गरज बनत चाललेल्या व्हॉटसअप  सातत्याने नवे फीचर आणत असते. आता पर्यंत ग्रुप मध्ये उठ-सुट कोणीही आपल्याला ग्रुप मध्ये ऍड करत असतो आणि आपल्या हितसंबंधांमुळे अनेकांना त्या ग्रुप मधून लेफ्ट होता येत नाही. त्यामुळे अनेकजण वैतागलेले आहेत विशेषतः महिलांना यामुळे मोठा मनःस्ताप सहन करावा लागतो. महिलांना त्यांच्या परवानगीशिवाय एखाद्या ग्रुपमध्ये अ‍ॅड करून त्या ग्रुप्समध्ये अश्‍लील मेसेजेस, फोटोज किंवा व्हिडीओज शेअर करण्याचे प्रकार घडले आहेत. याबाबत पोलीस स्थानकांमध्ये अनेकदा तक्रारीदेखील दाखल झालेल्या आहेत. या सर्व प्रकारांमधून बोध घेत   व्हॉटसअप ग्रुप्स प्रायव्हसीचं नवीन फीचर आणलं आहे. . परंतु आता तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुम्हाला  व्हॉटसअप  ग्रुपमध्ये ऍड  करु शकणार नाही.  व्हॉटसअपने  त्यासाठी नवे फीचर आणले आहे.


सुरुवातीला काही लोकांच्या मोबाईलवर हे फीचर प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत हे फिचर सर्वांसाठी उपलब्ध होईल


या फिचरचा वापर आपण  कसा करायचा

१. प्ले स्टोअरमध्ये जाऊन  व्हॉटसअप अपडेट करा

२   व्हॉटसअप सेटिंग्समध्ये जाऊन अकाऊंट्सवर क्लिक करा

३. अकाऊंट्समध्ये प्रायव्हसीमध्ये जा, तिथे ग्रुप्स असा ऑप्शन असेल, त्यावर क्लिक करा

४. ग्रुप्सवर क्लिक केल्यावर तीन ऑप्शन्स दिसतील, a)एव्हरीवन, b)माय कॉन्टॅक्टस आणि c)नोबडीa)एव्हरीवन : जर तुम्हाला केवळ तुमच्या ओळखीच्या लोकांनीच कोणत्याही ग्रुप्समध्ये ऍड  करावं, असं वाटत असेल तर माय कॉन्टॅक्ट्स हा ऑप्शन सिलेक्ट करा b)माय कॉन्टॅक्टस : तुम्हाला कोणीही ग्रुप्समध्ये ऍड  करु नये, असे वाटत असेल तर नोबडी हा ऑप्शन सिलेक्ट कराc)नोबडी : तुम्हाला कोणीही कोणत्याही ग्रुप्समध्ये ऍड  करावे, असे वाटत असेल तर एव्हरीवन हा ऑप्शन सिलेक्ट करा


Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.