Header & Footer Wide Ads

‘निर्भया’ च्या मारेकऱ्यांना लवकरच फाशी ?

तिहारमधील हालचालींना वेग… 
नवी दिल्ली –
संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या राजधानीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना बहुधा १६ डिसेंबरलाच फासावर लटकवले जाण्याची शक्यता आहे. फाशीची शिक्षा देण्यासाठी तिहार जेल प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. त्या आरोपींपैकी सर्वाधिक वजन असलेल्या आरोपीच्या वजनाप्रमाणे रेती भरून एक डमी व्यक्ती तयार करून त्याला फाशी देण्यात आली. तसेच निर्भया प्ररकरणातील एका दोषीला मंडोली जेलमधून तिहार जेलमध्ये हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे १६ डिसेंबरला या नृशंस घटनेला सात वर्ष पूर्ण होत आहे. 

या प्रकरणातील अन्य तीन आरोपी यापूर्वीपासून तिहार जेलमध्येच बंद होते. चौथ्यालाही तिहारमध्ये आणल्याने फाशीच्या शिक्षेची पूर्वतयारी मानली जात आहे. जर दोषींना फाशी देण्याचा निर्णय झालाच तर त्यासाठी वापरण्यात येणारा दोर त्यांच्या वजनाने तुटू नये यासाठी डमी तयार करून फाशी देण्यात येते. फाशी देण्यासाठी वापरण्यात येणारे विशिष्ट दोर बक्सरमधून मागवण्यात आले असल्याचीही चर्चा आहे. फाशी देण्यासाठी जल्लादची गरज भासल्यास उत्तर प्रदेश, महाराष्ट्र किंवा पश्चिम बंगालमधून जल्लाद बोलावण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. या प्रकरणातील पाच पैकी एका आरोपीनं तिहार जेलमध्ये २०१३ साली मार्च आत्महत्या केली होती.

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.