Header & Footer Wide Ads

निर्भया बलात्कार:दोषींना २२ जानेवारी रोजी फाशी

नवी दिल्ली – दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणात चारही दोषींची फाशी दिल्ली कोर्टाने कायम ठेवली आहे. २२ जानेवारी ही तारीख या चौघांच्याही फाशीसाठी निश्चित करण्यात आली आहे. सकाळी सात वाजता या चारही आरोपींनी फाशी देण्यात येईल असेही दिल्ली कोर्टाने म्हटले आहे. 

माझ्या मुलीला अखेर न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने प्रसारमाध्यमांना दिली आहे.

निर्भया बलात्कार प्रकरणातले आरोपी मुकेश, विनय शर्मा, अक्षयकुमार सिंह आणि पवन गुप्ता यांच्या डेथ वॉरंटवर सुनावणी झाली. दोषी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप निर्भयाच्या वकिलांनी केला. तर आमच्या पक्षकारांना क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करायची आहे असा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांनी केला. दरम्यान दिल्ली कोर्टाने  या चारही आरोपींविरोधात डेथ वॉरंट जारी केले. २२ जानेवारीला सकाळी सात वाजता या आरोपींना फाशी देण्यात यावी असे दिल्ली न्यायालयाने म्हटले आहे.

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.