Header & Footer Wide Ads

नाशिक रन ची तयारी पूर्ण : उद्या धावणार असंख्य नाशिककर

 नाशिक: ११ जानेवारी रोजी संपन्न होत असलेल्या नाशिक रन २०२० ची पूर्व झाली असून  नाशिक रन यशस्वीते साठी ४०० हुन अधिक स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले आहे. नाशिक रनचे उद्या  शनिवार ११ जानेवारी २०२० रोजी आयोजन करण्यात आले असून Bosch तसेच TDK- EPCOS  व सहभागी कंपन्यांचे ४०० हुन अधिक स्वयंसेवकाना  महात्मा नगर क्रीडांगणावर प्रशिक्षित करण्यात येत आहे, या प्रशिक्षणाची जबाबदारी Bosch Ltd, चे सुरक्षा व्यवस्थापक व नाशिक रन च्या Operation Team चे मुख्य श्री विजय काकड व त्यांचे सहकारी यशस्वी पणे पार पाडत आहेत 

नाशिक रन मध्ये विविध कार्य प्रणाली पार पडत असून या कार्यप्रणालिचे काम प्रभावी पणे व्हावे म्हणून त्यांची योग्य रचना विविध संघाच्या माध्यमातून केली आहे. रचना प्रभावी पणे पार पडावी म्हणून पुढील प्रमाणे योग्य ते संघाची निर्मिती पुढील प्रमाणे करण्यात आली आहे ,
असून क्विक रिस्पॉन्स संघ,सुरक्षा रक्षक संघ,स्वागत संघ,फ्लॅग ऑफ व्यवस्थापन संघ,हायड्रेशन पॉईंट संघ
मेडिकल सपोर्ट संघ,स्टेज व्यवस्था संघ,१० किलोमीटर रन रूट संघ 
५किलोमीटर फन रूट संघ 
चिअरिंग पॉईंट संघ,मेडल वाटप संघ
नाश्ता वाटप संघ यांची निर्मिती करण्यात आली आहे.


या रचनांचा व कामाचा आढावा नाशिक रन चे अध्यक्ष एच एस बॅनर्जी,   रन चे उपाध्यक्ष रमेश जी आर , सचिव  अनिल दैठणकार, खजिनदार राजाराम कासार विश्वस्त , मुकुंद भट, प्रबल रे , अशोक पाटील , श्री अनंतरामन ,श्री श्रीकांत चव्हाण आदी दैनंदिन कामाचा आढावा घेऊन रन मधीक कार्यरत असलेल्या विविध संघांना मार्ग दर्शन करीत आहेत तसेच रन च्या कार्यालयीन कामाच्या पुर्तते साठी श्री नितिन देशमुख, स्नेहा ओक व उमेश ताजनपुरे कार्यरत आहेत

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.