Header & Footer Wide Ads

सत्यजित बच्छाव आयपीएल संघांच्या अंतिम लिलाव यादीत

नाशिक(प्रतिनिधी)-नाशिककर क्रीडा शौकिनांसाठी आनंदाची बातमी. 19 डिसेंबर रोजी आयपीएल साठी होणाऱ्या खेळाडूंचा लिलाव प्रक्रियेसाठी नाशिकचा डावखुरा फिरकीपटु सत्यजित बच्छाव ची अंतिम 330 खेळाडूंच्या लिलाव यादी मध्ये निवड झालेली आहे. मागील वर्षीही सत्यजित आय पी एल च्या  लिलाव प्रक्रियेत होता परंतु सत्यजित वर बोली लागली गेली नाही. त्या लिलाव प्रक्रियेनंतर झालेल्या मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत त्याने स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद केले होते. परंतु यावर्षी लिलाव प्रक्रियेच्या आधीच बीसीसीआय च्या राष्ट्रीय पातळीवरील मुश्ताक अली टी-20  स्पर्धेत सत्यजित ने 15 गडी बाद केलेत व आयपीएल संघांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कालच संपलेल्या ह्या हंगामातील हरियाणा विरुद्ध च्या पाहिल्याच रणजी सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करत 3 गडी बाद केले . यावर्षी मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघाच्या निवड प्रक्रियेत सत्यजित सहभागी झाला होता. त्यामुळे यावर्षी एकोणवीस तारखेला होणाऱ्या आयपीएल लिलावामध्ये सत्यजित वर कोणता संघ बोली लावतो यावर सर्वांचे लक्ष आहे . तसेच या वर्षी आयपीएल खेळण्याची संधी सत्यजितला मिळावी अशी सर्व नाशिककर भावना व्यक्त करत आहेत.

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.