Header & Footer Wide Ads

शेअर बाजार ७८८ अंकांनी कोसळला

आंतरराष्ट्रीय तणावा मुळे शेअर बाजारावर [परिणाम , क्रूड ऑईल आणि सोन्याच्या दरात वाढ 
विश्वनाथ बोदडे 
८८८८२८०५५५
आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत चाललेला तणाव ,मागील आढवड्यात अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे प्रमुख कमांडर सुलेमानी यांचा झालेला मृत्यू आणि त्यानंतर इराण मध्ये झालेल्या हालचाली व  ट्रम्प यांचे आलेले वक्तव्य याचेच परिणाम आज भारतीय शेअर बाजारात सकाळपासून दिसत होते आणि ते शेवट पर्यन्त कायम राहिले.इंट्राडे मध्ये सेन्सेक्स ८५० पर्यन्त खाली गेला होता, परंतु शेवटी काही प्रमाणात मागणी आली ,  त्याचाच परीणाम म्हणून भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल ७८८ अंकांनी घसरून ४०६७६ ह्या पातळीवर स्थिरावला तर निफ्टी सुद्धा २३३ अंकांनी घसरुन १२००० च्या खाली म्हणजे ११९९३ ह्या पातळीवर बंद झाला.


याचाच परीणाम असा झाला की क्रूड ऑईल आणि सोने वर गेले यामुळे नक्कीच भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परीणाम होतील, करण देश्यात आयात करणारे क्रूड ऑईल महागात आयात करावे लागेल त्यामुळे पेट्रोलच्या किमती वाढतील व देशात महागाईत वाढ होऊ शकते. 
आजच्या सत्रात आई टी क्षेत्र सोडले तर  सर्वच क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा जोर दिसला प्रामुख्याने बँकिंग आणि ऑटो क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विक्री बघायला मिळाली. 
त्याच बरोबर निफ्ट फिफ्टी च्या खालील समभागांमध्ये चढ उतार बघायला मिळालेत.

निफ्टी ११९९३ – २३३

सेन्सेक्स ४०६७६ – ७८८


आज निफ्टी मधील पाच वधारलेला शेअर्स 

टायटन ११५७ + १.५२% विप्राे २५२ + ०.३४% डाँ.रेड्डी २८८५ + ०.०४%टिसीएस २२०१.३५ + ०.०३%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव


एस बीआय ३१८.४० – ४.५८%बजाजफायनंस ४००४ – ४.५२%व्हिईडीएल १५०.७० – ४.४६%झील २६१.५० – ४.४६%येसबँक ४५.३० – ३.८२%
यु एस डी  आई एन आर $ ७१.६९४९

सोने १० ग्रॅम              ४०८२३.००

चांदी १ किलो             ४८३७०.००

क्रूड    ऑईल               ४५९८.००

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.