Header & Footer Wide Ads

शेअर बाजारासह महागाई ही वाढली

 सब कुछ उचाई पे: शेअर बाजार, सोने, क्रूड ऑईल आणि महागाई सुद्धा? 

विश्वनाथ  बोदडे ,नाशिक
संपर्क-८८८८२८०५५५
भारतीय शेअर बाजारात आज चौथ्या दिवशी सुद्धा तेजीत बंद झाला. ग्लोबल मार्केट सुद्धा मिक्स ट्रेंट बघायला मिळत आहेत,   इराण आणि अमेरिका यांच्यात काही प्रमाणात होत असलेली शांतता, यूएस चायना ट्रेड डील आणि येणार अर्थसंकल्प यालाच बाजार सकारात्मक घेत आहे.

महागाई दर सर्वात उंच स्तरावर असतांना सुद्धा आज बाजार सकारात्मक बंद झाला. याचाच परीणाम म्हणून ३० समभागांचा  मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ९३ अंकांनी वधारून ४१९५२ ह्या पातळीवर स्थिरावला तर ५० समभागांचा समावेश असलेला नॅशनल स्टॉक एक्सचेंज चा निर्देशांक  निफ्टी सुद्धा ३२ अंकांनी वधारून १२३६३ ह्या पातळीवर बंद झाला. 


असे पहिल्यांदाच होत आहे की महागाई दर नोव्हेंबरच्या  ५.५४% तुलनेत डिसेंबर चे जे महागाईचे आकडे आले आहेत ते ७.३५% , जुलै २०१४ मध्ये असलेली महागाई चे दर आले आहेत . परंतु त्याच बरोबर शेअर बाजार सुद्धा उच्च स्तराला जात आहे. 


असे का होत आहे.


आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या प्रकारच्या घडामोडी घडत आहेत त्याचा हा परीणाम तर आहेच. इराण आणि अमेरिका व यूएस आणि चायना यांच्यातील ट्रेड वार याचाच परीणाम सर्वत्र दिसत आहे.  परंतु भारतात महागाई चे आकडे वाढण्या मागे मुख्य  करण आहे ते म्हणजे  सातत्याने वाढत असलेल्या इंधनाच्या किंमती. जर इंधन दर वाढले तर त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर होत असतो. मग वाहतुकीचे दर वाढतात, त्यामुळे रोज वापराच्या किमती सुद्धा वाढत असतात. 


कसे थांबवू शकतो

सरकारने महागाई वाढणार नाही याला प्राथमिकता देणे गरजेचे आहे, त्यासाठी विदेशातून  क्रूड ऑईल ची आयात कमी करणे आणि देशामध्ये क्रूड ऑईल ची निर्मिती वर भर देणे.
सरकारने पेट्रोल आणि डिझेल वर लावण्यात येणारे कर कमी करणे.बायो गॅस चलीत गाड्या बाजारात आणणे.इलेक्ट्रिकल गाड्या बाजारात आणणे.जनतेमध्ये ह्या सर्व प्रकाराबद्दल जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे.आजच्या सत्रात दिवसभर बाजार अस्थिर स्वरूपात दिसला , शेवटच्या टप्प्यात बाजाराने परत तेजीच्या दिशेने वाटचाल केली आणि शेवट सकारात्मक केला. 

निफ्टी १२३६२ + ३२.७५

सेन्सेक्स ४१९५२ + ९३


आज निफ्टी मधील पाच वधारलेला शेअर्स  

व्हिईडीएल १६५ + २.८७%ब्रीटानीया ३११५ + २.३०% हिराेमाेटाेकाे २४१५.५० + २%आयटीसी २३४ + १.६१%सिपला ४८५.२० + १.५८%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव
येसबँक ३८.६० – ८.३१%इंडुसीनबँक १४७८ – ४%युपीऐल ५८५ – १.१४%रिलायंस १५२९ – १%एसबीआय ३२८ – १%


यु एस डी  आई एन आर $ ७०.९२४२

सोने १० ग्रॅम               ३९४२५.००

चांदी १ किलो              ४६०६८.००

क्रूड    ऑईल               ४१३५.००

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.