Header & Footer Wide Ads

पूर परिस्थितीत आरोग्याची काळजी घ्या : वैद्य विक्रांत जाधव यांचा सल्ला


नाशिक– महाराष्ट्रातील अनेक भागात पावसामुळे पूर स्थिती निर्माण झाली आहे. नाशिकसह ,कोकण कोल्हापूर ,सांगली,सातारा या ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.  परिस्थिती मुळे  मोठ्याप्रमाणात रोगराई पसरण्याची शक्यता आहे त्यामुळे आपले आरोग्य आपणच संभाळण्या साठी काही उपाय सर्वांनी करावे . 
वैद्य  विक्रांत जाधव यांनी आपल्या आरोग्या विषयी काळजी  घेण्यासाठी आहारात काय काय आवश्यक आहे आणि ते आचरणात आणावे या साठी महत्वाच्या काही गोष्टी जनस्थान ऑनलाईनच्या माध्यमातून सांगितल्या आहेत.त्या गोष्टी आपण आपल्या  या पूर परिस्थितीत पाळाव्यात 


महाराष्ट्रातमध्ये पूर परिस्थिती असताना  हे हवामान रोगाला प्रोच्छाहन  देणारे आहे नाशिकच्या नागरिकांनाच नव्हे तर इतर सर्व जिल्यातील  नागरिकांनी  आपल्या आहारात  महत्वाची काळजी घेतल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल

महत्वाच्या टिप्स

पाणी  पितांना त्यामध्ये आले टाकून  पाणी उकळून घ्यावे


तळलेले पदार्थ टाळावे,साबुदाणा आणि चण्याचे पदार्थ बाहेरील पदार्थ टाळावे


घरातील स्वयंपाक उकळलेल्या पाण्याने  करावा


पाले भाज्या टाळाव्यात ,कोणतीही पाले भाजी खाऊ नये


गोड पदार्थ टाळावेत,तरुणांनी बाहेरील पदार्थ खाऊ नये

 
आपल्या आहारात आल्याचा वापर अधिक करावा  आणि  सतत गरमच पाणी घ्यावे

गव्हाचे पदार्थ कमी घ्यावे उपवासाला  साबुदाणा आणि  तळलेले पदार्थ खाऊ नये


थंड पाणी पिऊ नये ,शीतपेय घ्यायचे असल्यास त्यामध्ये  लिंबाचा रस  आणि आल्याचा रस टाकून घ्यावे


रात्रीझोपताना गरमच पाणी घ्यावे, लहान मुलांना सर्वांगाला सह  छातीला तिळाचे तेल  किंवा अभ्यंग तेल  लावावे ,दमा संधिवात रुग्णांना  हि  हे तेल  लावावे


फॅन खाली झोपू नये , अति जास्त जेवण करू नये


मावसाहार  टाळावा आणि विशेषतः अंडी सर्वांनी टाळणे आवश्यक आहे या वातावरणात खूप व्याधी होऊ शकतात


हा सल्ला वैद्य विक्रांत जाधव यांनी जनस्थानच्या माध्यमातून आपल्याला दिला आहे. आपण स्वस्थ असला तर कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकाल त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या 

ReplyForward
Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.