Header & Footer Wide Ads

देशातील प्रथम नियुक्तीचा मान नाशिकला

मुख्य बचाव वकील म्हणून ॲड.फारूक शेख यांची नियुक्ती

नाशिक – (संतोष लोळगे) जिल्हा न्यायालयात विधी सेवा प्राधिकरणाच्या कायदेशीर मदत केंद्राचे मुख्य बचाव वकील म्हणून माजी सरकारी वकील ॲड. फारूक अजिज शेख यांची नियुक्ती झाली आहे. अशा प्रकारची विशेष नियुक्ती होण्याचा देशातील प्रथम मान नाशिक जिल्हा न्यायालयास प्राप्त झाला आहे. 

आर्थिक दुर्बल घटक, ज्यांच्यावर गुन्हा केल्याच्या आरोपाखाली न्यायालयात चौकशी होते,त्या व्यक्ती आर्थिक क्षमतेअभावी स्वतःच्या बचावासाठी वकीलाची नियुक्ती करू शकत नाहीत. केवळ आर्थिक क्षमता नसल्यामुळे कोणालाही न्याय नाकारला जाऊ शकत नाही अशी उदात्त भावना भारतीय राज्यघटनेत आहे. त्यामुळे आर्थिक दुर्बलांना शासन खर्चाने बचावासाठी वकील देण्याची पद्धत होतीच. परंतु या पद्धतीत एकसुत्रतेचा अभाव जाणवत होता व क्षमतावान वकील बचावासाठी मिळावा यासाठी कोणतीही कार्यपद्धती विहीत नव्हती. 

आर्थिक दुर्बलांना सुद्धा शासन खर्चाने स्वतःच्या बचावासाठी उत्कृष्ट वकील मिळायला पाहिजे हे विविध न्याय निवाड्यात अधोरेखीत केलेले होते. त्यानुसार कायद्याप्रमाणे प्रथमच याबाबत कार्यपद्धती तयार करण्यात आली व ही कार्यपद्धती संपूर्ण भारतात सर्वप्रथम नाशिक जिल्हा न्यायालयात कार्यन्वीत झाली आहे. जिल्हा बचाव वकील म्हणून माजी सरकारी वकील ॲड. फारूख अजिज शेख यांची मुलाखतीअंती निवड झाली. तर ॲड. रवी बालाजी सांगळे, ॲड. निलेश जयप्रकाश राठी यांची उपमुख्य बचाव वकील तर सहायक बचाव वकील म्हणून ॲड. विजय निवृत्ती गुळवे यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्वांनी आज (दि.६) सकाळी कार्यभार स्वीकारला. 

याप्रसंगी महाराष्ट्र व गोवा विधी परिषदेचे अध्यक्ष ॲड. अविनाश भिडे, माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य ॲड. जयंत जायभावे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे, सहायक सरकारी अभियोक्ता सुधीर कोतवाल, बिपीन शिंगाडा, ज्येष्ठ विधीज्ञ एम.टी.क्यू. सय्यद, मिनाज काझी, ए.जे. पाटील, ॲड. हर्षल केंगे आदींनी  उपस्थित राहून नवनियुक्तांचे अभिनंदन केले.

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.