Header & Footer Wide Ads

सुखी जीवनाचे रहस्य:शनिशास्त्र

 हरिअनंत,नाशिक

भावगत शनी नीळसर,तेजपुंज, शुद्ध,सात्विक,निर्मल किरणांनी युक्त असून..स्वतःच्या निश्चित केलेल्या योग्य गतीने प्रवास करीत असतांना शनी हेतुपुरस्कर कुणाचेही अहित न करता कल्याण करतो. जन्मपत्रिकेत असलेल्या ग्रहांच्या स्थानानुसार   मानवी जीवनावर ग्रहानुसार परिणाम होत असतो.

 पत्रिकेतील ग्रहांचे स्थान,त्या ग्रहाचा  प्रवास,ग्रहयुती, प्रतियुती  या अश्या विविध कारणांमुळे विश्वातील  व्यक्ततींना  जीवनातील अनेक संकटांना,सुख-दुःखाना इच्छा नसतानाही  सामोरे जावे लागते. जन्म पत्रिकेतील प्रथम भाव म्हणजे ‘तनुस्थान’ .या तनुस्थानावरून ,बालपण,जन्मकालची परिस्थिती, आणि महत्वाचं म्हणजे रंग-रूप त्या व्यक्ततीचा स्वभाव या सर्व गोष्टींचा बोध या तनू स्थानावरून होतो.विशेष म्हणजे जन्मपत्रिकेचा आलेख,व्यक्तीचा कल,त्याची वैयक्तिक इच्छा, आणि त्याची क्षमता या विषयी अंदाज बांधता येतो.व्यक्तीच्या आवडी -निवडी या प्रथमस्थानावरून कळतात. त्याच प्रमाणे आयुष्य, आपल्या व्यवसायातील पार्टनर, व्यावसायिक स्पर्धक आणि इतर प्रतिस्पर्धी व त्यांच्या स्त्रिया, भाग्योदय,मन, जिद्द,या गुणविशे -शांचा बोध होतो. 

या प्रथम भावात मेष राशी  बलवान मानली जाते.या प्रथमभावाचा रंग  शुभ्र दिशा पूर्व आहे. यावरून मस्तकाविषयी बोध होतो. ज्या वेळेस लग्नेश उच्च राशीत ,शुभ संबंधित, बलवान आणि शुभ ग्रहांच्या दृष्टीत असतो तेंव्हा ती व्यक्ती देखणी व निरोगी असते व निश्चीत अशी व्यक्ती सुखि-समाधानी आयुष्य जगते. लग्नेश जर लग्नात असेल किंवा त्याची दृष्टी लग्नावर असेल तर त्याची फळे ही निश्चित शुभ मिळतात आणि आयुष्यात व्यक्तीची उन्नती अतिशय मोठ्या झपाट्याने होते.अर्थात लग्नी जो ग्रह असतो त्यावर ही शुभ-अशुभ फळे अवलंबून असतात. या विश्वातील प्रत्येक व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत लग्नी जी रास असते त्या राशीचा परिणाम त्या व्यक्तीच्या स्वभावावर  शरीरावर होत असतो. 

जन्मलग्नी जर मेष राशी  उदित असेल आणि त्या बरोबर शनी असेल, तर त्या व्यक्तीचा स्वभाव थोडा उतावळा व त्रासिक असतो. त्याच्या जीवनात निष्कारण भांडणतंटे निर्माण होतात.या व्यक्तीने कोणतेही काम अतिशय मन लावून केले, अतिशय सरळ भावाने काम करूनही, जवळचे मित्र, नातेवाईक व इतरेजनांच्या त्या कामाविषयी प्रतिक्रिया मात्र अतिशय विसंगत असतात. या विसंगत प्रतिक्रियेवरून वाद निर्माण होतो. आणि या वादातून भांडण अतिशय विकोपाला जाते.आणि हे असे वाद, भांडण यांच्या आयुष्यात सतत सुरूच असते.यावर उपाय ही आहे मात्र या व्यक्ती सतत आपल्या खोटया अहंकारात आयुष्यभर जगत असतात.शनीला अहंकारी,शिष्ट,गर्विष्ठ व्यक्ती मुळीच आवडत नाही.या अशा अहंकारी व्यक्तींचा अद्दल घडवल्या शिवाय  शनी त्यांना योग्य मार्ग मिळू देत नाही.लग्नी मेष राशी सोबत शनी असलेल्या व्यक्तींची राहणी ही.(क्रमशः)भाग 60 

संपर्क- 9921313677

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.