Header & Footer Wide Ads

देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड नाही – लष्कर प्रमुख

नवी दिल्ली – देशाच्या सीमा जेव्हा सुरक्षित असतील तेव्हाच देश प्रगती करेल. सैन्यदलाचे जवान हे देश सुरक्षित ठेवतील. आम्ही देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. लष्कर, नौदल आणि हवाईदल देशाच्या सुरक्षेसाठी तयार आहेत, असा विश्वास नवे लष्कर प्रमुख मनोज मुंकुंद नरवणे यांनी देशाला दिला. 
नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी लष्कर प्रमुखांनी 

नॅशनल वॉर मेमोरिअलला भेट दिली. या ठिकाणी त्यांनी सर्वप्रथम शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांनी देशवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी मानवाधिकारांच्या रक्षणासाठी विशेष काम करणार असून देशाच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे म्हटले आहे. लष्करी कारवाईसाठी सदैव तत्पर राहणे हे आमचे प्राधान्य असेल. आम्ही आमची क्षमता अधिक वाढवणार आहोत आणि पूर्वोत्तर क्षेत्रात आम्ही व्यापक काम करू असेही ते म्हणाले. 

माझी जबाबदारी अधिक योग्यरित्या पेलता यावी यासाठी सक्ती आणि साहस देण्याची मी देवाकडे प्रार्थना करत असल्याचेही लष्कर प्रमुखांनी सांगितले. लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी मंगळवारी भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला आहे. मनोज नरवणे देशाचे २८ वे लष्करप्रमुख ठरले आहेत. जनरल बिपिन रावत यांची केंद्र सरकारकडून संरक्षण प्रमुखपदी (चीफ ऑफ डिफेन्स) निवड करण्यात आली असून मंगळवारी ते लष्करप्रमुख पदावरुन निवृत्त झाले आहेत. जनरल बिपिन रावत यांच्या जागी लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची नियुक्ती करण्यात आली होती. लेफ्टनंट जनरल नरवणे यांनी लष्करात ३७ वर्ष सेवा बजावली असून, विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.