Header & Footer Wide Ads

निरोगी राहण्यासाठी उपाय

 आपण आयुष्य जगताना आपल्या भोवताली असलेल्या चैनीच्या गोष्टी मधे इतके रमून जातो की  आपला देह जो  मंदिर आहे, त्याकडे नीट लक्षही दिलं जात नाही. आनंदी राहण्यासाठी पैसा तर गरजेचा आहे  पण त्याहीपेक्षा सुदृढ आणि निरोगी असन  खूप महत्वाचे असते.  हे सुदृढ निरोगी म्हणजे आरोग्य नीट असणे,  शरीराचा प्रत्येक भाग निरोगी असणे. म्हणून प्रत्येकाने दोन गोष्टीचे सतत संगोपन करायला हवे. एक म्हणजे श्वास आणि दुसरे म्हणजे देह. श्वासात आपल्या आत्म्याची अनुभूती असते तर देह आपली ओळख आणि आपले कार्य पूर्णत्वास नेण्यास कार्यरत असतो. म्हणून आजार या शत्रू पासून लांबच राहायला हवे. निसर्गातच एवढी ताकद आहे कि निसर्गच  या आजाराचा कर्दन काळ ठरू शकतो .

निसर्गात आपल्या अवती भवती अनेक असे घटक आहे की त्याचा वापर करून आपण निरोगी राहू शकतो. त्याही पेक्षा आपल्यात असे काही घटक रोज निर्माण होतात की ते कुठल्याही आजारांवर मात करण्यासाठी सक्षम असतात. फक्त त्या घटकांची ओळख आणि त्याचा वापर कसा करावा हे माहिती असणे गरजेचे आहे. आणि NAA  (निसर्ग+आयुर्वेद=आरोग्य) हेच मानवी कर्तव्य समजून जन सेवेत कार्यरत आहे. 


मित्रांनो, वृक्षांचे आरोग्य व त्यांची निरोगी वाढ होण्यासाठी त्यांच्या मुळ सतत कार्यरत असतात. हवे असलेले पोषक घटक जमिनीतून पानफुला पर्यंत पोहचवत असतात. त्याच प्रमाणे आपले मुळ म्हणजे आपली पचन संस्था आहे. येथून आपल्याला हेवे असलेले पोषक घटक मिळत असतात. जर पचन संस्था नीट कार्यरत नसेल तर आपली निरोगी वाढ होऊ शकत नाही. मित्रांनो आता एखादे शरीर आजारी कसे होते आणि का होते ते आपण क्रमाने पाहूया… नीट वाचा म्हणजे कळेल…

१) पचन संस्थेचा बिघाड

शरीर आजारी का होते याचे कारण तुम्हालाही माहीत आहे. व्यसन, अपायकारक खाद्य, जेवणात महत्वाच्या घटकांचा अभाव, अपुरी झोप अशी कारण. यात सुधारणा आपल्या हाती असते. आणि येथून होते आजाराचा जीवघेणा प्रवास. येथेच जर प्रतिबंध घातला तर भविष्य निरोगी राहण्यास मदत होईल.

२) किडनी
हो एकदा का पचन संस्था बिघडली की पहिला परिणाम किडनी वर होतो … ज्यात रक्त शुद्ध करण्याचे काम होत असते. मग शरीराच्या विविध भागात अशुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. मग त्वचा रोग, खाज, त्वचा कोरडी पडून जखमा होतात. जे अनेक जण अनुभवत पण असतील. त्या सोबत पोटाचे त्रास सुरू होतात जसे अपचन, गॅस, छातीत दुखणे, पोट फुगणे, पित्त होणे. हे जवळ जवळ अनेक जण  अनुभवत असतील. तर मुळ पचन संस्था नीट ठेवली तर हे होणार नाही हे आता आपणास माहीत झाले असेलच.


 असे होणारे त्रास अनेकांना होतात असं म्हणणारे येथून दीर्घ आजाराकडे प्रवास करत असतात. आणि हा प्रवास सरळ मृत्यूच्या गुहेत जातो. जसे मूत्र पिंडाचा आजार, प्रोस्टेज ग्रंथी आजार, बद्धकोष्ठ, फिशर आणि मग आपसूकच भूक मंदावते आणि अजून पोषक घटक मिळणे बंद होते. मग रासायनिक औषधांचा वापर वाढत जातो आणि निसर्गात आपल्याला पोषक असलेले फळे पालेभाज्या ज्यातून आपल्याला नैसर्गिक जीवन सत्व मिळणार आहे त्या पासून आपण दूर जातो . याला जबाबदार स्वतः असतो लक्षात असू द्या. वेळीच सावध होऊन पचन संस्था नीट ठेवली तर हे टाळता येणे शक्य आहे .

आता वेळ येते दुर्धर आजाराची शरीराला पुरेसे ऑक्सीजन मिळणे बंद होऊन रक्त घट्ट होण्याचे प्रमाण वाढते मग मेंदूचे विकार आणि मग ब्रेन स्ट्रोक मुळे मृत्यूची भीती .शरीरात कॅन्सर पेशींची वाढ  


सुदृढ आरोग्यासाठी पाणी आवश्यक 

आहारातील निष्काळजी पणा मुळे  मृत्यूचा प्रवास आपणच स्वतः निवडतो. तेव्हा निसर्गाशी नाते जोडणे आरोग्यास वरदान ठरेल. तुमच्या मुखातील लाळ जगातील सर्वात मोठे औषध आहे. फक्त तिचा वापर कसा करावा समजून घेणे गरजेचे आहे. लाळ मधे महत्वाची घटक आहेत की त्याने अंगावरील जखमा, पोटातील संसर्ग यासह पचन संस्था बळकट होण्यास मदत होते. दिवसभरात आपल्या मुखात दीड लिटर लाळ तयार होत असते. आणि पुरेसे पाणी पिले तरच  लाळ मोठ्या प्रमाणात  बनत असते. म्हणून रोज ३ लिटर पाणी पिणे गरजेचे असते.

दुसरे म्हणजे घरातील मसाले पदार्थ जसे ओवा, लाँग, वेलची व बाजारात मिळणाऱ्या हिरव्या भाज्या, घरात उपलब्ध असलेल्या डाळी, अवती भवती  असलेली वनस्पती  जसे तुळस, पेरु, आंब्याचे झाड, निबु अशी   वनस्पती.आपल्या आजारावर मात करण्याची मोठी साधने निसर्गानेच निर्माण केली आहेत . 
मित्रांनो, तुम्ही आजपासून एक कराच… ज्या ज्या झाडाची फळं आपण खातो त्या त्या झाडाची पाने खा. निरोगी राहण्यासाठी उत्तम उपाय आहे… ३ लिटर पाणी प्या.. त्याने मुखात लाळ तयार होऊन पचन संस्था सुधारेल, बघा पाणी पिल्यावर ते आत जाईल. मग पुन्हा त्यात महत्वाचे घटक मिसळून लाळ रुपात औषध बनून मुखात येईल आणि हे औषध निरोगी बनवेल या देहाला.

तर मग आज कराल ना बदल जगण्यात…. चला तर मग निरोगी राहा… खुश रहा…. आपले वैद्य आपणच व्हा…रोज वेळ काढून या ग्रुप वरील पोस्ट वाचून स्वतःचे व इतरांचे आरोग्य दूत बना…
कैलास हीरोडकर (लेखक निसर्ग अभ्यासक आहेत)

संपर्क -+९१ ८१४९३४७३०९

संस्थापक : HK LEARNING & VIGHNAHARTA INVESTMENT

Header & Footer Wide Ads
1 Comment
  1. Keshav Kasar says

    उपयुक्त माहीती .

Leave A Reply

Your email address will not be published.