Header & Footer Wide Ads

आयामा इंडेक्स २०२० च्या माहिती पुस्तिकेचे आज प्रकाशन


नाशिक
-अंबड इंडस्ट्रीज अँड मॅनुफॅक्चरर्स एसओसिएशन (आयामा) या संस्थेचे औद्योगिक प्रदर्शनाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन आज सोमवारदि १३. ०१. २०२० रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी सौ हेमांगी पाटील यांच्या शुभहस्ते हॊणार असल्याची माहिती आयमाचे अध्यक्ष श्री वरून तलवार व आयामा इंडेक्स २०२० चे चेअरमन श्री धनंजय बेळे  यांनी दिली.

आयामा नेहमीच  औद्योगिक विकासासाठी नेहमीच प्रयत्न करीत आलेली आहे. उद्योगकांच्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाची व नवीन  उत्पादनाची माहिती ग्राहकांना व्हावी यासाठी आयामा इंडेक्स सारख्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन करीत असते . यावर्षी या प्रदशनाचे आयोजन डोंगरे वसतिगृह येथे १९ मार्च ते २२ मार्च २०२० दरम्यान करण्यात आले आहे.

या आयामा इंडेक्स २०२० च्या माहिती पुस्तिकेचे आज प्रकाशन संध्याकाळी ७ वा. मनोहर गार्डन, गोविंदनगर येथे होणार आहे. तरी स्टॉल धारकांनी व हितचिंतकांनी सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन आयामांचे अध्यक्ष श्री वरून तलवार, सरचिटणीस ललित बुब, आयामा इंडेक्स २०२० चे चेअरमन श्री धनंजय बेळे, आयपीपी राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष निखिल पांचाळ, सुदर्शन डोंगरे सचिव योगिता आहेर, राजेंद्र पानसरे, खजिनदार उन्मेष कुलकर्णी, दिलीप वाघ, गोविन्द झा व आयामा कार्यकारिणीने  केले आहे.   

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.