Header & Footer Wide Ads

वेध गौरव पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न

जनस्थान ग्रुप चा वेध पुरस्कार देऊन गौरव 

नाशिक- उत्तर महाराष्ट्रात गेल्या १८ वर्षापासून वेध फाऊंडेशनच्या माध्यमातून नाशिकमध्ये विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेवून वेध गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. यावर्षी श्रीक्षेत्र रामकुंड येथे हा सोहळा अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्हयाचे पालकमंत्री ना.छगनराव भुजबळ यांच्या हस्ते व कृषीमंत्री ना.दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, मनपा स्थायी समिती सभापती उध्दव निमसे, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन स्वामी नारायण ट्रस्टचे  स्वामी ज्ञानपुराणी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ना.भुजबळ यांनी वेध गौरव पुरस्कारर्थींचे कौतुक करुन वेध न्यूजच्या वेगवेगळया उपक्रमांचा उल्लेख करुन वेध न्यूजला देखील गौरविले. पूर्वीप्रमाणेच नाशिकमध्ये नाशिक फेस्टीव्हल आयोजन करण्याची घोषणा केली. तसेच नाशिकच्या विकासात समस्त नाशिककरांनी साथ देण्याचे आवाहन देखील केले. कुठलाही पक्षीय भेद न बाळगता नाशिकच्या विकासात हातभार लावणारे कुठलेही प्रकल्प रद्द केले जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी आर्वजून सांगितले.

या वर्षीच्या वेध गौरव पुरस्कारासाठी नाशिकच्या दिग्गज कलावंतांचा जनस्थान ग्रुप ,नगरसेविका समिना मेमन,व्हायब्रेशन ॲकेडमीचे संचालक किरण वाघमारे, पोलिस उपायुक्त व निर्भया पथक प्रमुख पौर्णिमा चौघुले, लायन्स क्लबचे अध्यक्ष जयओम व्यास,ज्योतीष शास्त्री नीता सोनवणे-बरोतकर,सहाय्यक पोलिस आयुक्त सोमनाथ तांबे,ग्रामसेवक कैलास वाघचौरे, नगरसेविका सत्यभामा गाडेकर,रुंगटा ग्रुपचे निखील रुंगटा, सुला वाईनचे उपाध्यक्ष संजीव पैठणकर,ज्येष्ठ नगरसेविका विमल पाटील,कृषी तज्ञ पांडुरंग वाठारकर,नगरसेविका स्वाती भामरे, युनिव्हर्सकल कम्युनिकेशनचे अशोक राहणे,ब्रम्हकुमारी प्रजापती विश्वविद्यालयाच्या निता दीदी,कामगार नेते व नगरसेवक प्रवीण तिदमे, न्यूज 18 नेटवर्कचे उपसंपादक विशाल परदेशी,विमा तज्ञ छगन साळी, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी,  हिराई प्लॅस्टीकचे संजय नाईक,नाशिकच्या प्रसिध्द साधना मिसळचे मंगेश आमले व राजन आमले, चित्रकार विनोद सोनवणेव दिगंबर अहिरे, मनपाच्या अग्नीशामक दलाचे विजय नागपुरे व नाना गांगुर्डे,गंगापूररोड भागात आढळलेल्या बिबटयाला जेरबंद करणेकामी जीवाची बाजी लावलेले नगरसेवक संतोष गायकवाड,पत्रकार कपिल भास्कर व तरबेज शेख कॅमेरामॅन किरण कटारे, दाऊद कादरी,उत्तर महाराष्ट्र गीनीज बुक ऑफ रेकॉडच्या समन्वयीका आमि छेडा, तसेच सानेगुरुजी शिक्षण प्रसारक संस्था व मार्शल आर्ट,सानिया खान व जय बालाजी बहुउद्देशिय संस्था आदी मान्यवरांचा व संस्थांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वेध गौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. यावेळी समुखी अथनी यांच्या कलानंद संस्था आणि ध्रृवी खताळ यांनी यावेळी नेत्रदिपक अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन या कार्यक्रमात रंग भरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सिमा पेठकर यांनी केले.

सदरच्या पुरस्कार वितरण समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमास  नाशिककरांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वेध न्यूजचे संतोष कमोद, सुहता योगेश कमोद, योगेश कमोद, राजेश कमेाद,शारदा कमोद, मनाली गर्गे, अमृता मोरे, संजय निरभवणे, निलेश केदारे, कमलाकर तिवडे, अनिल गुंजाळ, अजय नागरे, समिर रहाणे, प्रथमेश खराथ, विशाल वारुळे, ललित जाधव, अमर वझरे, राजू नाकील, साईनाथ गुंजाळ आदींनी परिश्रम घेतले.

नाशिकरांच्या पसंतीस असलेले नाशिक फेस्टिव्हल पुन्हा सुरू करणार…..

नाशिक फेस्टिव्हल माध्यमातून नाशिक शहरात विविध सांस्कृतिक, क्रिडा शैक्षणिक कला गुणांना वाव देण्याची संधी होती नाशिक फेस्टिव्हल बंद झाल्याने नाशिकरांचा हिरमोड झाला आहे तरी आज या गोदातीरी पुन्हा एकदा नाशिक फेस्टिव्हल सुरू करण्याचे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
नाशिकच्या विकासाला खिळ बसू देणार नाही शिवाय नाशिककरांवर कराचा बोजा लागू देणार नसल्याची शब्द देतांनी मी पण नाशिकचा आहे नाशिकरांच्या विकासा चे प्रकल्प बंद होऊ देणार नाही असा टोला आमदार देवयानी फरांदे यांना मारला.

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.