Header & Footer Wide Ads

दशकातील सर्वोत्तम पाच क्रिकेटपटूंमध्ये विराटचा समावेश

विस्डन क्रिकेटर ऑफ डिकेड
नवी दिल्ली –
दशकातील सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत पहिल्या पाचमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा समावेश झाला आहे. यामुळे विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा रोवला गेला आहे. ‘विस्डन क्रिकेटर अॉफ डिकेड’ यादीत कोहलीसोबत डेल स्टेन, एबी डिव्हीलियर्स, स्टिव्ह स्मिथ आणि महिला क्रिकेटपटू एलिस पेरीचा समावेश करण्यात आला आहे.

गेल्या १० वर्षात विराट कोहलीने तब्बल ५ हजार ७७५ धावा ठोकल्या आहेत. वेळोवेळी विराटने आपल्यासमोरील आव्हानांवर मात करुन स्वतःच्या खेळात सुधारणा केली आहे. ५ वर्षांच्या कालावधीत विराटने ६३ च्या सरासरीने धावा काढल्या असून या दरम्यान त्याने २१ शतकं आणि १३ अर्धशतकं झळकावली आहेत. याच कारणासाठी विराटचा या यादीत सहभाग करण्यात आलेला आहे, विस्डनने स्पष्टीकरण दिले आहे. 


दरम्यान, दशकातील ११ सर्वोत्तम कसोटीपटूंच्या यादीतही विराटला स्थान मिळाले आहे. विस्डनच्या यादीतील दशकातील सर्वोत्तम ११ क्रिकेटपटू 

अ‍ॅलिस्टर कूक (इंग्लंड), डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)कुमार संगाकारा (श्रीलंका), स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया), विराट कोहली (भारत), बेन स्टोक्स (इंग्लंड), एबी डी व्हिलिअर्स (दक्षिण आफ्रिका)रविचंद्रन अश्विन (भारत), डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका), कॅगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका), जेम्स अँडरसन (इंग्लंड)

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.