Header & Footer Wide Ads

साप्ताहिक राशिभविष्य रविवार 12 जानेवारी ते शनिवार 18 जानेवारी 2020

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
चंद्रप्रवेश ‘कर्क, सिंह, कन्या, तुळ’ राशीत आहे. 
मेष: वास्तुसंबंधीत कामांना गती येईल. मोठी खरेदी कराल. नेहमीच्या आयुष्यात काही बदल घडतील. भागीदारी व्यवसायात वितुष्ट येऊ शकते. जोडीदाराला विश्वासात घ्या. अपत्यांशी संबंधित प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. त्यांच्याशी संवाद साधा. सप्ताहाचा उत्तरार्धात उत्तम आर्थिक प्राप्ती होईल. नवीन संधी चालून येतील. जोडधंदा सुरू करू शकता. दूरच्या नात्यातून लाभ होतील. वाहने जपून चालवा.       

वृषभ:- सप्ताहाची सुरुवात जोरदार होणार आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. येणी वसूल होतील. व्यापारात तुमचा दबदबा राहील. संधी चालून येतील. प्रसंगी तुम्ही कडक भूमिका घ्याल. प्रवासात ओळखी होतील. जोडीदाराशी संवाद साधाल. मोठी खरेदी होईल. घरात काही महत्वाचे बदल संभवतात. प्रवास कार्यसाधक होतील. धाडसी निर्णय घ्याल. कुलदेवीची उपासना लाभदायक ठरेल.  

मिथुन:- कलाप्रांतात  चमक दाखवाल. तुम्ही मुळात बोलके, चतुर आहात. हा कालावधी तुमच्यातील गुणांना वाव  देणारा आहे. अपत्यांशी मतभेद संभवतात. प्रवासात काही अडचणी येऊ शकतात. स्पर्धेत यश मिळेल. मोठा पराक्रम गाजवाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. येणी वसूल होतील.

कर्क:- तुमच्या आवडीच्या गोष्टी घडतील. मेजवानीच बेत आखाल. चैन कराल. छोटे प्रवास होतील. मन मोकळे कराल. ग्रहमान अनुकूल आहे. उत्तरार्धात आर्थिक प्राप्ती चांगली होईल. मन प्रसन्न राहील. घरात मात्र काहीशी अशांतता राहील. कुटुंब नाराज होणार नाही याची काळजी घ्या. शुभ कार्यात सहभागी व्हाल. दानधर्म करणे लाभदायक ठरेल.  

सिंह:-सप्ताहाची सुरुवात काहीशी संथ आहे. खर्चात वाढ होईल मात्र लवकरच ती भरून निघेल. काळजीचे कारण नाही. हाताखाली काम करणारे लोकं, भागीदार यांच्याशी वितुष्ट येऊ शकते. संयमाने परिस्थिती हाताळा. आत्मविश्वास वाढेल. विक्री तंत्रात यश येईल. कारभार वाढेल. उत्तरार्ध आर्थिक लाभाचा आहे. शब्द देताना जपून द्या.   

कन्या:- सप्ताहाची सुरुवात जोरदार होणार आहे. आर्थिक लाभाचा कालावधी आहे. मन प्रसन्न राहील. आत्मविश्वास वाढेल. मनाजोगती कामे होतील. नवीन भेटवस्तू मिळतील. जीवनाचा आनंद घ्याल. मध्यात व्ययस्थानातील चंद्र खर्चात वाढ करेल. मन अस्वस्थ राहील. मात्र लवकरच मळभ दूर होईल. उत्साह वाढेल.  

तुळ:-कामकाजाच्या ठिकाणी मन रमेल. आर्थिक प्राप्ती चांगली होणार आहे. ग्रहमान अनुकूल आहे. संधीचा लाभ घ्या. दगदग वाढेल मात्र यश मिळेल. महत्वाचे कामे पूर्वार्धात मार्गी लागतील. एरवी कठोर बोलण्याचा तुमचा स्वभाव नसला तरी या काळात तुम्ही कठोर भूमिका घ्याल. काही लोक बोलण्याने दुखावले जाऊ शकतात. उत्तरार्ध खर्च वाढवणारा आहे. नियोजन करा.  

वृश्चिक:- ग्रहमान अनुकूल आहे. अडचणी दूर होऊ लागल्या आहेत. उत्साह वाढेल. मार्ग दिसू लागतील. जुनी येणी वसूल होतील. संयम बाळगणे हिताचे आहे. मृदू बोलण्याने बरीचशी कामे मार्गी लागू शकतात. वारसा हक्काने लाभ मिळेल. कोर्टात यश मिळेल. दूरचे प्रवास होतील. कामात मन रमेल. उत्तरार्ध प्रचंड लाभाचा आहे. संधी चुकवू नका.

 धनु:- ग्रहमान संमिश्र आहे. सप्ताहाची सुरुवात आरोग्यच्या प्रश्नाने होऊ शकते. पुरेशी विश्रांती घ्या. घरातील जेष्ठ व्यक्तीकडे लक्ष पुरवणे आवश्यक आहे. सूचक स्वप्ने पडतील किंवा काहीतरी शुभसंकेत मिळतील. येणी वसूल होऊ शकतात. कोर्टात कामे पुढे ढकलली जातील. शेअर्स सारख्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल.  

मकर:- ग्रहमान संमिश्र आहे. जोडीदाराला विश्वासात घ्या. प्रेमीजनांना शुभसमाचार समजतील. सप्ताहाची सुरुवात उत्साहवर्धक आहे. कामाचा ताण वाढेल. काही वेळेस क्रोध अनावर होईल. विक्री क्षेत्रातील लोकांना यश मिळेल. कलाप्रांतात चमक दाखवाल. आरोग्य सांभाळा. शनी देवाची आराधना करा.

कुंभ:- सप्ताहाचा पूर्वार्ध आत्यंतिक लाभाचा आहे. अर्थप्राप्ती चांगली होईल. कठोर बोलणे टाळा. आर्थिक वसुली होईल. भावंडांशी भेट होईल. प्रवास कराल. तुम्ही कमी बोलणारे असले तरी या कालावधीत उत्तम संवाद साधाल. मन मोकळे कराल. रखडलेले प्रश्न चर्चेने सुटू लागतील. राजकीय भेद टाळा. लवकरच साडेसाती सुरू होत आहे. मन तयार करा.  

मीन:- ग्रहमान अनुकूल आहे. संधीचा लाभ घ्या. स्पर्धेत यश मिळेल. अपत्यांकडून शुभसमाचार येतील. धाडसी निर्णय घ्याल. नवीन वाट शोधाल. आर्थिक प्राप्ती उत्तम होणार आहे. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या अंमलात आणल्या जातील. परिस्थिती हळूहळू बदलू लागली आहे. अपेक्षा पूर्ण होऊ लागतील.  

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.