Header & Footer Wide Ads

साप्ताहिक राशिभविष्य रविवार 5 जानेवारी ते शनिवार 11 जानेवारी 2020

 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
चंद्रप्रवेश ‘मेष, वृषभ, मिथुन, कर्क’ राशीत आहे.
मेष:- सप्ताहाचा उत्तरार्ध चांगला आहे. मनाजोगती कामे होतील. महत्त्वाची कामे पूर्वार्धात न करता उत्तरार्धामध्ये करा. आर्थिक आवक चांगली राहील. कलाकारांना यश मिळेल. भागीदारी व्यवसायात लक्ष घालावे लागेल. तुमच्या शब्दास मान मिळेल. अधिकारात वाढ होईल. नातलग भेटतील. धाडसी निर्णय घ्याल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी निर्माण होऊ शकते.      

वृषभ:- सप्ताहाच्या पूर्वार्धात कामे यशस्वी होतील. महत्त्वाचे करार या कालावधीत करून घ्या. आर्थिक आवक उत्तम राहील. प्रवास कार्यसाधक होतील. नवीन ओळखी होतील. त्यातून लाभ मिळेल. जुनी येणी वसूल होतील. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. गृहसौख्य लाभेल. सल्ला मिळेल. कायद्याच्या कचाट्यात सापडणार नाही याची काळजी घ्या. नियम काटेकोरपणे पाळा. घरातील ज्येष्ठ व्यक्ती कडून योग्य 

मिथुन:- सप्ताहाचा पूर्वार्ध अनुकूल आहे. मनाजोग्या ठिकाणी बदलीचे योग येतील. उद्योग व्यवसायात लाभ होतील. आर्थिक आवक चांगली राहील. स्पर्धेत यश मिळेल. विरोधक नामोहरम होतील. नवीन उद्योग सुरू करण्याचा विचार कराल. मन प्रसन्न राहील. महत्त्वाची कामे पूर्वार्धात करून घ्या. विक्री व्यवसायातील व्यक्तींना उत्तम लाभ होतील. भावंडांकडून मदत मिळेल. नवीन करार करताना काळजी घ्या. कलाकारांना यश मिळेल. शब्द देताना विचारपूर्वक द्या.

कर्क:- सप्ताहाचा पूर्वार्ध अत्यंत अनुकूल आहे. तुमच्या मनाप्रमाणे कामे होतील. उद्योग-व्यवसायात तुमची कीर्ती पसरेल. हितशत्रूंच्या कारवाया थंडावल्या जातील. अचानक धनलाभ संभवतो. शेअर्स सारख्या गुंतवणुकीतून किंवा जुन्या गुंतवणुकीतून या कालावधीत लाभ मिळेल. सरकारी नियम काटेकोरपणे पाळा. नवीन ओळखी लाभदायक होतील. शिक्षणासाठी दूरचे प्रवास घडतील. उत्तरार्धात खर्चात वाढ होऊ शकते.  

सिंह:- सप्ताहाचा उत्तरार्ध अनुकूल आहे. महत्त्वाची कामे पूर्वार्धात नकोत. तुम्हाला उत्तम आत्मविश्वासाचे वरदान लाभलेले आहे. या जोरावर तुम्ही वाटचाल कराल. नवीन उपक्रम राबवाल. त्यात यश मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. कोर्ट कामात यश मिळेल. उद्योग-व्यवसायात तुमचा दबदबा राहील. दूरच्या ज्येष्ठ नातेवाईकांची भेट होईल. त्यातून लाभ होतील. स्पर्धेत यश मिळेल. सप्ताहाच्या पूर्वार्धात घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची चिंता सतावेल. नेतृत्व कराल.  

कन्या:- ग्रहमान संमिश्र आहे. जोडीदाराकडून उत्तम साथ मिळेल. विवाहेच्छुकांना शुभ समाचार समजतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. हाताखाली अथवा सोबत काम करणाऱ्या लोकांकडून सहकार्य मिळेल.शिक्षणासाठी प्रवास संभवतात. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात यश मिळेल. सप्ताहाच्या मध्यात आरोग्याची चिंता निर्माण होऊ शकते. महत्त्वाची कामे सप्ताहाच्या उत्तरार्धात मार्गी लागतील. अडथळे दूर होतील. जुनी येणी वसूल होतील. कोर्ट कचेरीत यश मिळेल.  

तुळ:- ग्रहमान संमिश्र आहे. जैसे थे परिस्थिती राखणे उत्तम आहे. उद्योग-व्यवसाय नेहमीप्रमाणे चालू राहील. आर्थिक आवक ठीक राहील.अचानक जुन्या गुंतवणुकीवर परतावा मिळेल. नवीन करार करताना काळजीपूर्वक करा. या सप्ताहात स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. जुने दुखणे डोके वर काढू शकते. व्यवसायात भागीदाराकडून शुभ समाचार समजतील. वाहने जपून चालवा. 

वृश्चिक:- तुमचा मूळचा स्वभाव पराक्रमी आहे. या सप्ताहात तुम्ही काही महत्वाचे निर्णय घ्याल. उद्योग-व्यवसायात उत्तम लाभ मिळतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. छोटे प्रवास कार्यसाधक होतील. सप्ताहाच्या मध्यात आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. योग्य आणि पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. तुमचे विरोधक नामोहरम होतील. जोडीदाराकडून उत्तम साथ मिळेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. सरकारी नियम काटेकोरपणे पाळा. श्री हनुमान उपासना लाभदायक ठरेल.

धनु:- सप्ताहाचा पूर्वार्ध अनुकूल आहे. गृहसौख्य लाभेल. मोठी खरेदी कराल. नवीन वास्तू घेण्याचे योग आहेत. घरात काही महत्त्वाचे बदल कराल. अपत्यांकडून शुभ समाचार समजतील. छोटे प्रवास कार्यसाधक होतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. पूर्वार्धात महत्त्वाची कामे मार्गी लागतील. प्रकल्प सुरळीत होतील. तुमचे अंदाज अचूक ठरतील. सप्ताहाच्या उत्तरार्धात आरोग्याची चिंता निर्माण होऊ शकते. धावपळ झाल्याने विश्रांतीची गरज भासेल. सप्ताहाच्या शेवटी कुटुंबीयांसमवेत वेळ व्यतीत कराल. 

मकर:– तुमच्या अंगात  चिकाटी आहे. या सप्ताहात या गुणांच्या जोरावर तुम्ही वाटचाल करणे इष्ट. मित्र आणि नातलग यांच्याकडून मोलाचे सहकार्य मिळेल. घरात अस्वस्थ वाटल्यास हनुमान उपासना करा. धाडसी निर्णय घ्याल. पराक्रम गाजवाल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. राजकीय क्षेत्रात चमकाल. कलाकारांना यश मिळेल. लेखकांना शुभ समाचार समजतील. गृहसौख्य लाभेल. मोठ्या खरेदीचे बेत आखाल. सप्ताहाच्या उत्तरार्धात आरोग्याच्या चिंता निर्माण होऊ शकतात. पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. दानधर्म करणे लाभदायक ठरेल. 

कुंभ:- ग्रहमान अनुकूल आहे. आर्थिक आवक चांगली राहील. उद्योग व्यवसायात यश मिळेल. कलाकारांना हा आठवडा लाभदायक ठरेल. नातलगांकडून फायद्याचे प्रस्ताव येतील. तुमच्या शब्दास मान मिळेल. अधिकारात वाढ होईल. तुमचे नेतृत्व सर्वत्र मान्यता पावेल. हितशत्रूंच्या कारवाया कमी होतील. प्रवास कार्यसाधक होतील. अपत्यांकडून शुभ समाचार समजतील. प्रवासात झालेल्या नवीन ओळखी लाभदायक ठरू शकतात. नवीन आर्थिक करार करताना काळजी घ्या. 

मीन:- या सप्ताहात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल.कलाकारांना यश मिळेल. आर्थिक आवक उत्तम राहील. मित्रांकडून लाभ होतील. नवीन उद्योग व्यवसाय सुरु करणे हिताचे ठरेल. दैनंदिन कामकाजापेक्षा वेगळे उपक्रम सुरू करण्यात तुम्हाला उत्साह येईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. सप्ताहाच्या अखेरीस छोट्या सहलीचे आयोजन कराल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.