Header & Footer Wide Ads

उन्हाळ्यात काय खावे ! काय खाऊ नये ! काय करावे !काय करू नये !

वैद्य विक्रांत जाधव ,नाशिक

नाशिक थंड शहर कि उन्हाळी शहर असा प्रश्न उपस्थित झाला तो ४१ अंश तापमान गेल्यामुळेआणि ते ४३ पर्यंत जाणार असे भाकीत..त्यात असलेला लग्न महोत्सव ,मुंजी,साखरपुडा असे कार्यक्रम ज्या मध्ये नवीन वा जड वस्त्र घालावी लागतात ..अश्यात काही विशेष काळजी घेतल्यास नाशिक मध्ये उन्हाळा त्रास देणार नाही असे घडू शकते..कसे तर असे …


उष्णतेचे विकार- पथ्य- अपथ्य 

उन्हाळा वाढल्यानंतर विविध प्रकारचे उष्णतेचे विकार वाढायला सुरुवात होते. खर तर खूप व्यक्तींना मुळातच काही पित्ताचे विकार किंवा तत्सम उष्णतेने वाढणारे व्याधी किंवा लक्षण असतात व ती वातावरणातील उष्म्याने वाढू लागतात. परंतु उन्हामुळे व्यक्तींना तहान लागणे, शरीरात आग होणे, पोटात आग होणे, घाम येणे, चक्कर येणे, थकवा येणे, पोटऱ्या दुखणे अशी विविध लक्षणे दिसू लागतात. उन्हाळा हे एक कारण असले तरी ह्या सर्व लक्षणांना निर्माण करणारी शरीराची त्रीदोषांची विकृत अवस्था वेगळी असल्याकारणाने ‘एकच पथ्य’ नसून शास्त्रकारांनी त्यांना विभक्तपणे वर्णन करून आरोग्य संस्थापन करण्यासाठी निश्चित व नेमकी कल्पना मांडली आहे.पाणी एक उन्हाळ्यातील वरदान, मात्र सिद्ध केले तर अमृतच उन्हाळ्यात  आग होत असल्यास थंड पाणी, वाळा, चंदन घातलेले पाणी किंवा कापराने(camphor) सिद्ध केलेले पाणी सेवन केल्यास अत्यंत फायदा होतो, तर सारखी तहान लागत असल्यास तांब्याच्या वा रौप्य पात्रातील पाणी, तसेच नारळाच्या पाण्याने बरे वाटते. ह्या अवस्थेत धने, जिरे टाकून सिद्ध केलेले पाणी ही उत्तम गुणकारक ठरते. लघवीला जळजळ होत असल्यासही धने, जिरे, बडीशोप टाकून पाणी सिद्ध करावे व तेच सेवन करावे. लघवीच्या तक्रारींमुळे थकवा येत असल्यास वरील पाण्यात गोखरू टाकून पाणी  सिद्ध करावे. अत्यंत लाभप्रद ठरते.मातीच्या भांड्यातील पाण्यामध्ये  नैसर्गिक गुणांची वृद्धी होते ,नैसर्गिक शीतलता मिळते ज्याने कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही .माती नंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी थंड असून कफ नाशन करणारे आहे ताम्रा नंतर कास्याच्या  भांड्यातील पाणी हे उत्तम तर चांदी मध्ये पाणी शुद्ध होते,मात्र गरम राहते 
उष्णता- पथ्य कल्पना 

शरीराची उष्णता होत असताना दुध, तूप, लोण्याचे वय, प्रकृती व अवस्थेप्रमाणे यथेच्छ सेवन करून आरोग्य प्रस्थापित करता येते. तर तहानेचा त्रास असतांना केवळ गायीचे दुधच सेवन करता येते. दही,शास्त्रकारांनी दोन्ही अवस्थांमध्ये टाळायला सांगितले आहे. चक्कर, गरगर ह्या त्रासामध्ये गायीचे तूप व लोणीच सेवन करावे . पातळ ताक, धने, जिरे आणि कोथिंबीर ह्यांनी सिद्ध केलेले असेल तर लघवी च्या तक्रारी  मध्ये गुणकारक ठरते. शरीरात आग होत असता साळीच्या  लाह्यांचे पाणी सेवन केल्याने  चांगला फायदा होतो. शरीरात दाह होत असतांना किंवा चक्कर येत असतांना गरम पाण्याचे सेवन करू नये,लक्षणे बळावण्याची शक्यता असते. उष्णतेच्या कारणांनी होत असलेल्या सर्व अवस्थांमध्ये मूग, मसूर व हिरव्या मटारचे सेवन केल्यास फायदा होतो. हिरव्या मुगाला शास्त्रकारांनी महत्व दिले असून लहान मुले, स्त्रिया, वृद्ध, गर्भिणी हा सर्वांनी हिरव्या मुगाच्या लाडूचे सेवन करावे, थकवा कमी होतो, बल वाढते, त्वचेला संरक्षण मिळते आणि भूक उत्तम राहण्यास मदत होते. तहनेच्या त्रासामध्ये ओली हळद व आले ह्यांचे सेवन उपयुक्त ठरते. पोटामध्ये आग होत असतांना ओली हळद तसेच शिंगाडा व शिंगाड्याचे पदार्थ व कामालकांदाची पाण्यात केलेली खीर चांगला गुण देते. दाह असता खिरीमध्ये खडीसाखर टाकून घ्यावी,खाडीसाखरेला अनैसर्गिक साखरेपेक्षा अधिक महत्व आहे हे गुणांनी सिद्ध झाले आहे 

उष्णता पथ्य 

उष्णता असताना कोणती भाजी खावी हा गहन प्रश्न असंख्य गृहिणींच्या मनात येतो आणि उपलब्ध असलेल्या भाज्या तयार केल्या जातात. अंगात आग होत असल्यास किंवा तहान अधिक लागत असल्यास केळफूल व पडवळाची भाजी रुजकर व बलप्रद ठरते तसेच गारवा देते. फणसाच्या बियांची भाजी चांगली पथ्यकारक ठरते. आग होत असतांना तोंडली, दुधीभोपळा, पालक ह्या भाज्या योग्य पद्धतीने केल्यास उयुक्त ठरतात. मेथी मात्र दोन्ही अवस्थेत अयोग्य असून दाह, तहान तसेच उष्णता वाढवणारी ठरते. डांगर, वांगी, शेवगा ह्या भाज्या शरीराची आग होत असताना टाळाव्यात. शेवग्याची फुले व पाने मात्र ह्याला अपवाद ठरतात. उष्णतेमुळे घेरी येत असल्यास पालेभाज्या खाऊच नयेत. तसेच उष्णतेच्या त्रासात कार्ली देखील टाळायला हवीत. कोहाळ्याचा मात्र उष्णतेमध्ये खूप प्रमाणात उपयोग होत असतो. म्हणून भोपळ्याऐवजी कोहळा उष्णतेत सतत खावा. कोहळ्याचे सूप, कोहळ्याचे पराठे, पेठा इत्यादी प्रकारे कोहोळा वापरता येतो. “कोहोळापाक” हा एक अत्यंत प्रसिद्ध प्रकार बालवध ठरतो. शरीराची आग होत असतांना तसेच तहान अधिक लागत असतांना काकडी हा उत्तम पदार्थ आहे. काकडीची कोशिंबीर मात्र वर्ज्य आहे( दह्या मुळे). केवळ काकडी जमल्यास किंचित मिरपूड टाकून घ्यावी मात्र त्यावर पाणी सेवन करू नये हे ध्यानात असावे उष्णतेत आग होत  असताना  विशेष आहारीय पाणीदार द्रव्य उष्णतेत तहान असतांना भगर, साळीचे तांदूळ आणि ज्वारी  फायदा करतात मात्र  शरीराची आग होत असल्यास भगर नाचणी ह्याचे सेवन करू नये. तांदूळ, साळीच्या लाह्या, सातूचे पीठ सेवन करावे. पित्तामुळे घेरी येत असल्यास मका, मटार, नाचणी वर्ज्य करावेत. मात्र तांदूळ सातुसह गहू खावेत. फळांमध्ये कैरीचा काही अवस्थेतला अपवाद वगळता सर्व आंबट फळे सेवन  करावीत . स्ट्रॉबेरी, आलूबुखार, अननस व तसेच कलिंगडदेखील उष्णता, आग, तहान किंवा चक्कर येणे ह्या अवस्थांमध्ये खाऊ नये असे शास्त्रीय मत आहे. आवळा मात्र उष्णता, तहान सर्वांमध्ये गुणकारक ठरतो. केळी द्राक्ष, डाळींब, कवठ, फालसा  हे सर्व अवस्थांमध्ये तर तहनेमध्ये करवंद उपयोगी ठरतात. नारळाचे पाणी तहान व उष्णतेवर उत्तम औषध आहे. कफाचा त्रास असणाऱ्यांनी त्यात आलं टाकून घेतल्यास तर लिंबू टाकल्यास एक अप्रतिम पेय होते . तहान असतांना मसाल्यापैकी वेलची, जायफळ गुणकारी ठरतात परंतु आग होत असतांना नव्हे . कोथिंबीर मात्र सर्व ठिकाणी गुणकारक  ठरते. तहानेमध्ये  टोमाटो खावू नये. तसेच मीठ व मसालेदार हे तहान व आग होत असताना टाळावेत. शरीराची आग होत असतांना कांदालसूण खाऊ नये असे शास्त्रकारांनी ठासून सांगितले आहे मात्र तहनेमध्ये त्याचा उपयोग होतो. आग होत असतांना गाजराचे सेवनही करू नये.


उन्हाळ्यातील मंतरलेले पाणी


 उन्हाळा सुरु झाला की शरीर व मनाच्या आरोग्याच्या तक्रारी अगदी तपासून तेथेट नागीण,कांजण्या पर्यंत दिसू लागतात .खर तर योग्य आहार नियोजन वविहार नियोजन त्या मध्ये वस्त्र ,त्यांचे रंग ,सायंकाळची वस्त्र,बिछान्यावरीलवस्त्र अश्या अनेक गोष्टीचा विचार युक्ती पूर्वक केल्यास उन्हाळा साजरा करतायेईल .एक तर खाण्याची चंगळ उन्हाळ्यात असते,ताडगोळे,तोंडाला पाणीआणणाऱ्या कैरी पासून ते आंब्यापर्यंत ,ओली काजू,कुयरी ,करवंद,त्याचे विविधपदार्थ अगदी शरीराला तृप्त करतात. ह्यांचा उपभोग घेता आला पाहिजे ,ह्यासाठी उन्हाळ्यातील पथ्य आणि अपथ्य ह्यांचे उत्तम नियोजन करायला हवे उन्हाळ्यात पाणी हाच पदार्थ मुळात योजायला हवा.केरळ मध्ये गरम विविधवनस्पतींनी भावित असे पाणी सेवन करण्याची प्रथा आहे.हे पाणी सगळ्यांनादिले जाते कीं बहुना सगळे बाटलीतून घेऊन फिरतात आणि तिथे उन्हाळ्याचे विकार अत्यल्प होताना दिसतात ,कारण त्यांनी पाण्यावर शरीराचे नियोजन केलेआहे .ह्या पाण्यात नागरमोथा,जेस्थ्माध ,थोडसे चंदन,खैरसाल,सुंठ ह्यांचे ईश्रणअसते ,ह्या मिश्रणाने पाणी भावित करतात आणि हेच पाणी सगळे सेवनकरतात,ह्या बरोबर साथ असते ती ताकाची त्याला “ मोर “ असे म्हणतात .हेमिश्रण मुंबई पुणे नासिक व इतर शहरांमध्ये अय्यप्पा मंदिराच्या बाहेरील दुकानंमध्ये उपलब्ध आहे .हे पाणी तहान भगवते,सतत पाणी सेवन करण्याची ओढकमी करते,शरीर थंड तर ठेवतेच पण भूक ही वादावते,त्वचा थंड ठेवण्याचेविशेष काम हे करते ,सौंदर्य वादावते,लघवीचा त्रास कमी करून पोटाचा हि त्रासकमी करते ,केवळ एक भावित अपनी म्हणून पाण्याच्या सेवनाला खूप महत्व आहे पाण्याला …

वैद्य विक्रांत जाधव

संपर्क +९१ ९८२२०५४३००

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.