Header & Footer Wide Ads

५ जी नेटवर्कच्या माध्यमातून चीन मध्ये झाली जगातील पहिली रिमोट सर्जरी

चीन – जगातील प्रथम रिमोट सर्जरी नुकतीच चीन मध्ये करण्यात आली. ५ जी नेटवर्क चे तंत्रज्ञान वापरून मनुष्यावर  जवळपास ३ हजार किलोमीटर वरून हि यशस्वी सर्जरी करण्यात आली.

ह्युवेई आणि चीन मोबाइल आणि चीनी पीएलए जनरल हॉस्पिटल चे सहकार्य या साठी लाभले होते या आठवड्यात हि सर्जरी करण्यात आली. , सर्जन लिंग झीपेई यांनी ५ जी तंत्रज्ञान वापरून हे सर्जिकल ऑपरेशन केले त्यावेळी ते दक्षिण चीनच्या हेनान प्रांतामध्ये होते, त्यांनी पार्किन्सन रोग असलेल्या रुग्णांमध्ये न्यूरो-उत्तेजक किंवा ‘मेंदू पेसमेकर’ बनवून आणि 5 जी नेटवर्कद्वारे ने प्रतिमांद्वारे वैद्यकीय उपकरणे हाताळून त्यांनी हि सर्जरी केली. सुमारे ३ तास हि सर्जरी सुरु होती.

आपली प्रतिक्रिया देताना सर्जन लिंग झीपेईं ने सांगितले ह्युवेई आणि चायना मोबाईल द्वारे प्रदान केलेल्या लो-लेटेंसी 5 जी तंत्रज्ञानासह प्रक्रिया मुळे हि सर्जरी शक्य झालेली आहे, नेटवर्कच्या तात्काळ डेटा प्रसारण क्षमते मुळे . “रीयल-टाइम ऑपरेशनसारखे वाटले आपण तीन हजार किमी दूर असल्याचेही वाटत नव्हते रुग्ण आपल्या जवळच आहे असेच वाटत होते .या सर्जरी नंतर रुग्ण चांगला झाला आणि हि सर्जरी यशस्वी झाली आहे असे लिंग यांनी सांगितले

Header & Footer Wide Ads

Leave A Reply

Your email address will not be published.